उपवेद आणि वेदांगे (षडांगे)
Contact us

₹1,200

₹1,500

Language: Marathi

वैदिक साहित्यामध्ये वेदांबरोबरच उपवेद आणि वेदांगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चार वेदांची नावे आपण कुठेतरी ऐकलेली असतात. मात्र उपवेदांविषयी फारच कमी लोकांना माहिती असते. वेदांबरोबरच उपवेदांचे सह अस्तित्व आहे. ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद हा आहे. यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद हा आहे. सामवेदाचा उपवेद गंधर्ववेद हा आहे. अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे स्थापत्यवेद हा आहे. यालाच शिल्पवेद या नावानेही ओळखले जाते. उपवेदांचे प्राचीनत्वही वेदांइतकेच आहे. दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त असे हे चार उपवेद आहेत. प्रत्येक भारतीयाला वेदांबरोबरच उपवेदांचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. उपवेदांबरोबरच वेदांगे म्हणजे वेदांची अंगे अशी सहा वेदांगे आहेत. त्यांनाच षडांगे असे म्हटले जाते. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद आणि ज्योतिष अशी ही सहा वेदांगे आहेत. मौखिक परंपरेद्वारे वेदांचे जतन करण्यामध्ये आणि ते वेद जसेच्या तसे आपणापर्यंत पोहोचवण्यामध्ये या वेदांगांचे फार महत्वाचे योगदान आहे. वेदांची रचना आणि कार्य अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेदांगांना जणू वेदांच्या शरीराचे अवयव असे मानले गेले आहे. वेदांगामध्ये विविध शास्त्रांचा गहन अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये उच्चारण म्हणजे ध्वनी शास्त्र, खगोल शास्त्र, भाषा आणि व्याकरण शास्त्र, शब्दार्थ आणि लक्षार्थ, पंचांग आणि मुहूर्त इ. अनेक शास्त्रांचा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केलेला आहे. वेदांगामुळे वैदिक वाड्मयाचा अभ्यास चांगल्या रीतीने करता येतो. म्हणूनच 14 विद्यांमध्ये 4 वेद, 4 उपवेद आणि 6 वेदांगे यांचा समावेश केला जातो. वेदांगाचा श्रुतींवर आणि नंतरच्या स्मृती ग्रंथांवर तसेच अभिजात साहित्यावर मोठा प्रभाव पडलेला आहे. वैदिक साहित्यामध्ये उपवेद आणि वेदांगाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रत्येक भारतीयाला उपवेदांचा आणि वेदांगांचा परिचय असणे आवश्यक आहे. या कॅप्सूल कोर्समुळे आपल्याला उपवेद आणि वेदांगांचा परिचय होईल आणि त्याचे महत्व जाणून घेता येईल.

कॅप्सूल कोर्स मधील विषय

✅ उपवेदांचा इतिहास, रचना आणि ओळख
✅ आयुर्वेद
✅ धनुर्वेद
✅ गंधर्ववेद
✅ स्थापत्यवेद अथवा शिल्पवेद
✅ सहा वेदांगे - रचना आणि ओळख
✅ शिक्षा आणि कल्प
✅ व्याकरण आणि निरुक्त
✅ छंद आणि ज्योतिष्य
✅ वेदांगांचे महत्त्वपूर्ण योगदान

मार्गदर्शक

डॉ. मृणालिनी नेवाळकर

पीएच.डी. (पुराणे: भैरवाचे पवित्र आणि लोकपरंपरागत स्वरूप – पुराणकथा, धर्मशास्त्र आणि विधी यांचा अभ्यास)
एम.ए. (वेद), एम.ए. (व्याकरण), एम.फिल (पुराणे: नारसिंह – पौराणिक स्रोतांच्या आधारे अध्ययन)

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे

06 ते 10 जुलै, 2026

सकाळी 07:15 ते 08:30