दहा प्राचीन उपनिषदे
Contact us

₹1,200

₹1,500

Language: Marathi

उपनिषदे हा वैदिक साहित्याचाच भाग आहे. वेदांचे संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ आणि उपनिषदे असे भाग आहेत. वेदांमधील विचारधन, वेदाचे अंतरंग म्हणजे उपनिषदे आहेत. उपनिषदांना वेदाचे तत्त्वज्ञान किंवा वैदिक तत्त्वज्ञान असेही म्हटले जाते. उपनिषदांचे दोन प्रकार आहेत. मुख्य उपनिषदे आणि गौण उपनिषदे. मुख्य उपनिषदे दहा आहे. त्यांना प्राचीन उपनिषदे असे म्हटले जाते. त्यामध्ये ईशावास्य, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोनिषद, मांडूक्योनिषद, तैत्तिरिय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक यांचा समावेश होतो. याच बरोबर कौशितकी, श्वेताश्वर आणि मैत्रायणी यांचीही गणना प्राचीन उपनिषदांमध्ये केली जाते. अन्य उपनिषदांना गौण उपनिषदे असे म्हणतात. त्याची संख्या 108 आहे असे मानले जाते. काहीजण 250 हून अधिक उपनिषदे आहेत असे प्रतिपादन करतात. मुख्य 10 उपनिषदांवर आद्य शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे आणि ती मुख्यत: ब्रम्हविद्यांचे ज्ञान प्रदान करतात. उपनिषदातील विचार अत्यंत विलक्षण असून मानवी प्रतिभेचा, मानवी बुद्धीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे उपनिषदे अशी मान्यता आहे. संपूर्ण विश्वामध्ये उपनिषदांच्या तोडीचे किंवा समकक्ष ज्ञान कुठेही आढळत नाही यावर विद्वानांचे एकमत आहे. उपनिषदांमधील रचना गद्यमय आणि पद्यमय अशी मंत्रात्मक आहे. त्याचा कर्ता एक नाही. उपनिषदांतील गोष्टी आणि कथा विलक्षण आहेत. गुरू शिष्य संवादेन अशा तऱ्हेने उपनिषदे आपल्या बुद्धीची तहान भागवतात. आपल्या प्रश्नांची उत्तरे देतात. विश्वाची कोंडी सोडवतात. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे देतात. उपनिषदांच्या अभ्यासातून एक अपूर्व असे समाधान आणि आनंद प्राप्त होतो. प्रत्येक भारतीयाने इतकेच नव्हे तर या विश्वातील प्रत्येक मानवाने उपनिषदांचे अमृत प्राशन केले पाहिजे. या कॅप्सुल कोर्स मध्ये आपण उपनिषदांची माहिती करून घेणार आहोत.

कॅप्सूल कोर्स मधील विषय

✅ उपनिषदांचा इतिहास, निर्मिती आणि काळ
✅ उपनिषदांची व्याख्या आणि प्रकार
✅ दशोपनिषदांची ओळख
✅ छांदोग्य उपनिषद
✅ बृहदारण्यक उपनिषद
✅ ईशावास्य उपनिषद आणि केन उपनिषद
✅ कठ उपनिषद आणि प्रश्नोपनिषद
✅ तैत्तिरिय उपनिषद आणि ऐतरिय उपनिषद
✅ मुंडक उपनिषद, मांडूक्य उपनिषद
✅ उपनिषदांची आजच्या काळातील उपयुक्तता

मार्गदर्शक

डॉ. उदय कुमठेकर

PhD (Commerce), M.Phil, MBA, M.Com, B.Com

Expert in Upanishad, Darshan Shashtra and Adi Shankaracharya

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे

06 ते 10 जुलै, 2026

सकाळी 07:15 ते 08:30