रहस्य सृष्टी उत्पत्तीचे
Contact us

₹1,200

₹1,500

Language: Marathi

पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला या सृष्टीची निर्मिती कशी झाली असेल असे जन्मजात कुतूहल असते. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील कित्येक गोष्टी तो पहात असतो, अनुभवत असतो. या गोष्टी कुठून आल्या ? त्या विशिष्ट प्रकारे कार्य का करतात ? सूर्य, चंद्र, ग्रह, तारे हे कुठून निर्माण झाले ? त्यातून त्यांना सूर्यमालेची माहिती होते. त्यातून मग आपली आकाशगंगा... आणि त्यातून अशा असंख्य आकाशगंगा... आणि त्यातून निर्माण झालेले हे ब्रह्मांड ..... भरती - ओहोटी, दिवस - रात्र, उन्हाळा, पावसाळा हिवाळा असंख्य प्रकारचे वृक्ष, पशु, पक्षी, किडे, मुंग्या….. कुणी यांना निर्माण केले असेल ? हे सर्व कशापासून निर्माण झालेले आहे? ही सृष्टी किती वर्षापासून अस्तित्वात आहे ? तिचे कार्य इतके सुनियंत्रितपणे कसे चालते ? अशा अनेक गोष्टी समजून घेण्याचे प्रत्येकाला आकर्षण आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून त्याच्या ज्ञानात वृद्धी होते आणि त्याची समज म्हणजे जाणीव विकसित व्हायला मदत होते. सृष्टीच्या उत्पत्ती बाबत आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की सुमारे 14 अब्ज वर्षापूर्वी ब्रम्हांडाची निर्मिती झाली. त्यावेळी एक प्रचंड महास्फोट झाला. त्यातून ब्रह्मांड निर्माण झाले. यालाच बिग बँग थिअरी असे म्हणतात. मात्र तो स्फोट होण्यापूर्वी काय होते ते सांगता येत नाही, ही बिग बँग थिअरीची मोठी कमतरता आहे. प्राचीन भारतीय सनातन वैदिक हिंदू ज्ञान परंपरेनुसार सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य आध्यात्मिक मार्गाने उलगडू शकते. वेद, उपनिषदे, दर्शने आणि पुराण ग्रंथामध्ये पृथ्वीचे आणि ब्रह्मांडाचे अस्तित्व अनादी अनंत आहे असे म्हटले आहे. पुराणग्रंथामध्ये पृथ्वीची उत्पत्ती आणि तिचा लय ही एक चक्राकार प्रक्रिया आहे असे म्हटले आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून हे ब्रह्मांड निर्माण झाले आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय असे तिचे स्वरूप आहे असे मानले जाते. नासदीय सूक्तांमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी महत्त्वपूर्ण भाष्य केलेले आहे. या कॅप्सूल कोर्सद्वारे आपण सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यातून आपल्याला विलक्षण ज्ञान मिळेल, विविध प्रकारच्या संकल्पनांची ओळख होईल. त्यातून आपल्या बुद्धीचा आणि जाणिवांचा विस्तार होईल. संवेदना आणि समज विस्तृत होईल स्वतःचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेता येईल. नवीन विचार सापडेल नवीन प्रकारचे ज्ञान मिळेल. बौद्धिक आनंदाची प्राप्ती होईल. प्रत्येकाने हा कॅप्सूल कोर्स केला पाहिजे असे आग्रही निवेदन आहे.

कॅप्सूल कोर्स मधील विषय

✅ सृष्टी आणि ब्रह्मांड
✅ सृष्टी निर्मिती बाबत आधुनिक विज्ञानाचा विचार
✅ सृष्टी निर्मितीच्या विविध थिअरी
✅ बिग बँग थिअरी आणि तिच्या मर्यादा
✅ सृष्टी निर्मितीचा प्राचीन भारतीय विचार
✅ वेद आणि उपनिषदातील वर्णन
✅ नासदीय सुक्तातील सृष्टी निर्मितीची मीमांसा
✅ पुराण ग्रंथातील सृष्टी निर्मितीचे विचार
✅ वैदिक दर्शनांमधील सृष्टी निर्मितीचे विचार
✅ सृष्टी निर्मिती ज्ञानाची आजच्या काळातील उपयुक्तता

मार्गदर्शक

डॉ. आशुतोष अभ्यंकर

PhD (Temple Architecture), MA (Indology), Heritage Expert

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे

20 ते 24 जुलै, 2026

सकाळी 07:15 ते 08:30