There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Language: Marathi
पुराण ग्रंथ म्हणजे प्राचीन भारताचा खराखुरा लिखित इतिहास आहे. पुराणांची निर्मिती वेदकाळापासून झालेली आहे. वैदिक साहित्यामध्ये पुराणांचे संदर्भ आढळतात. वेदांप्रमाणेच फार फार पूर्वी सर्व पुराणे एकत्रच होती आणि त्यांना महापुराण असे म्हटले जायचे. महर्षी वेदव्यासांनीच ज्याप्रमाणे वेदांचे चार वेदांमध्ये वर्गीकरण केले, त्याप्रमाणे त्यांनीच महापुराणांचे अठरा पुराणांमध्ये वर्गीकरण करून संकलन केले. त्यांनाच पुराणांचा कर्ता असे मानले जाते. खरंतर पुराणग्रंथ हाच भारताचा अस्सल इतिहास आहे. जर प्रामाणिक आणि निष्पक्ष बुद्धीने, कोणताही अभिनिवेश किंवा आकस न धरता, कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय पुराणांचा अभ्यास केला तर इसवी सन पूर्व साठ हजाराहून अधिक वर्षांचा भारताचा इतिहास आपल्याला प्राप्त होतो. त्याचा त्यासाठी त्या दृष्टीने, भारतीय दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. भारताची प्राचीन काळापासून इतिहास लेखनाची पद्धत वेगळ्या प्रकारची आहे आणि आधुनिक पाश्चात्य इतिहास लेखनापेक्षा ती भिन्न आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पुराण म्हणजे प्राचीन काळापासून सुरू असलेले आख्यान. पुरा म्हणजे जुने...जुने म्हणजे किती जुने तर सृष्टीच्या उत्पत्ती पासूनचे एवढे जुने...एवढे प्राचीन. पुरा शब्दाचाच अर्थ अत्यंत प्राचीन असा आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासूनचे व्यावहारिक, प्रापंचिक , धार्मिक आणि अध्यात्मिक ज्ञान देणारे साधन म्हणजे पुराण ग्रंथ. प्रत्येक पुराणांमध्ये पाच विषयांचे वर्णन असते १) सर्ग (सृष्टीची उत्पत्ती) २) उपसर्ग (सृष्टीचा लय) ३) मन्वंतर (कालावधी) ४) वंश (वंशाची निर्मिती) ५) वंशानुचरित (राजवंशाचा इतिहास) प्रत्येक पुराणाची रचना वेगळी आहे. वैदिक ज्ञान सोपे करून ते सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला सहज समजेल अशा स्वरूपात सुलभ आणि रंजक स्वरूपात प्रस्तुत करणे हा पुराणांचा महत्त्वाचा उद्देश आहे. भारतामध्ये दररोज किंवा चातुर्मासामध्ये घराघरात मंदिरात पुराणवाचन आणि पुराण ऐकण्याची व्यवस्था होती. पुराणांमधून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साधण्यासाठी विविध प्रकारचे उपयुक्त ज्ञान प्राप्त होते. पुराणे म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यामध्ये भूगोल, खगोलशास्त्र, मूर्तीशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, परंपरा, इतिहास यांचे ज्ञान प्राप्त होते. देवता आणि ऋषी, व्रते, अनुष्ठाने ,सण ,उत्सव तसेच राजांची चरित्रे पौराणिक कथा याची माहिती मिळते.या कॅप्सूल कोर्स मधून आपण मुख्यतः 18 पुराणांचे ज्ञान प्राप्त करून घेणार आहोत.
✅ पुराणांचा इतिहास आणि निर्मिती
✅ पुराणांचे भारतीय ज्ञान परंपरेतील योगदान
✅ पुराणांनी हाताळलेले विषय
✅ पुराणांचे प्रकार
✅ ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, वायु (शिव) पुराण
✅ भागवत पुराण, नारद पुराण, अग्निपुराण, मार्कंडेय पुराण
✅ भविष्यपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, ब्रम्हवैवर्त पुराण
✅ कर्मपुराण, स्कंदपुराण, वामन पुराण, गरुड पुराण
✅ मत्स्यपुराण आणि ब्रह्मांड पुराण
✅ पुराणांची उपयुक्तता आणि महत्त्व
प्रा. प्रणव गोखले
MA (Sanskrit), Expert in Vedanta Philosophy