There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Language: Marathi
नास्तिक याचा अर्थ जो वेदांना आणि वैदिक परंपराना मानत नाही. यज्ञ परंपरा त्यांना मान्य नाही. ईश्वराचे किंवा कोणत्यातरी यज्ञात सर्व शक्तिमान अशा शक्तीचे अस्तित्व त्यांना मान्य नाही. भारतीय ज्ञान परंपरांचे वैशिष्ट्य हे आहे की सर्व प्रकारच्या विचारांना येथे स्थान प्राप्त आहे. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यावर चर्चा आणि विचार मंथन केले जाते. समजून घ्यायचा आणि समजून सांगायचा प्रयत्न केला जातो. जी तीन दर्शने किंवा विचार अवैदिक म्हणून ओळखली जातात त्यांनी जीवन विषयक आणि सर्वश्रेष्ठ ज्ञानाबद्दल अत्यंत वेगळे विचार मांडले आहेत. त्यांना ईश्वराचे अस्तित्व मान्य नाही. त्यांचे संस्थापक यांनी स्वतः प्रचंड साधना, तपश्चर्या आणि विचार मंथन करून त्यांचे स्वतंत्र विचार मांडले आहेत. चार्वाक दर्शनामध्ये आपले शरीर हेच एकमेव अस्तित्व मानले आहे. मृत्यूनंतर आपले अस्तित्व संपले. आपल्याला इंद्रियांद्वारे जी अनुभूती प्राप्त होते तेच एकमात्र प्रमाण आहे, बाकी सर्व थोतांड आहे, असे चार्वाक दर्शन सांगते यालाच लोकायत दर्शन असेही म्हणतात. गौतम बुद्धापासून सुरू झालेल्या बौद्ध दर्शनाने दुःख हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे असे मानून दुःखापासून मुक्ती हेच सर्वोच्च ध्येय असा विचार मांडला आहे.यामध्ये चार आर्य सत्ये आणि अष्टांग मार्गातून दुःख मुक्ती असा विचार मांडला आहे. भगवान ऋषभ देवांपासून सुरू झालेल्या जैन दर्शनाचा प्रणेता भगवान महावीर असून त्यामध्ये अहिंसा, आत्मशुद्धी आणि अनेकांतवाद याचे प्रतिपादन केले आहे. बौद्ध आणि जैन दर्शनामध्ये श्रवण परंपरा आणि भिक्षू परंपरा निर्माण झाल्या. अवैदिक दर्शनांनी अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा विचार उपलब्ध करून दिला. त्यातून संपूर्ण ज्ञान प्रक्रियेला विविध आयाम प्राप्त झाले. या कॅप्सूल कोर्समध्ये अवैदिक दर्शनांचा आपण परिचय करून घेणार आहोत.
✅ अवैदिक दर्शनांचा इतिहास आणि निर्मिती
✅ चार्वाक अर्थात लोकायत दर्शन
✅ गौतम बुद्ध - जीवन चरित्र
✅ बौद्ध दर्शन
✅ बौद्ध दर्शनातील उपपंथ
✅ जैन दर्शन
✅ भगवान महावीर - जीवन दर्शन
✅ 24 तीर्थंकरांची परंपरा
✅ आजीविका म्हणजेच अज्ञान- नास्तिक परंपरा
✅ बृहत भारतीय तत्त्वज्ञानामध्ये अवैदिक दर्शनाचे योगदान
डॉ. उदय कुमठेकर
PhD (Commerce), M.Phil, MBA, M.Com, B.Com
Expert in Upanishad, Darshan Shashtra and Adi Shankaracharya