लोक संस्कृती अर्थात लोक साहित्य लोक कला आणि लोक परंपरा
Contact us

₹1,200

₹1,500

Language: Marathi

लोकसंस्कृती ही भारतीय संस्कृतीची एक विलक्षण अशी ओळख आहे. लोकसाहित्य, लोककला आणि लोकपरंपरा मिळून लोकसंस्कृती तयार होते. लोकसंस्कृतीचा प्रवाह मौखिक स्वरूपाचा असतो आणि तो एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे असा हस्तांतरित होत असतो. अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन लोकसंस्कृतीमधून होते. एकंदरीत संपूर्ण सामूहिक समाजमनाचे स्पंदन म्हणजे लोक संस्कृती होय. यामध्ये अनुभवजन्य ज्ञान, चालीरीती, परंपरा, सामाजिक रूढी आणि जीवनशैली यांचा प्रवाह लोक संस्कृतीमध्ये पिढ्यानपिढ्या प्रवाहित राहतो. दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य लोकांना येणारे अनुभव, घटना, गमती जमती यातून लोक साहित्य तयार होते. यामध्ये ओव्या, म्हणी, उखाणे, लोककथा, दंतकथा, लोकगीते इत्यादींचा समावेश होतो. तसेच स्त्रियांनी तयार केलेली गीते, अंगाई गीते, जात्यावरील गाणी इत्यादींचाही समावेश होतो. लोकसाहित्याचा कोणी एक विशिष्ट असा लेखक नसतो. लोकसंस्कृती म्हणजे मानवी जीवनातील जिवंत अनुभूती, मानवी स्वभावाचे विविधांगी पैलू आणि मानवी भावनांचे उत्कट प्रकटीकरण यांचे एक विलक्षण मिश्रण असते. त्यामध्ये एक प्रकारची सहजता असते. लोकसंस्कृती हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून स्वतंत्र आणि समांतररित्या अस्तित्वात असणारी आगळीवेगळी ज्ञान परंपरा आहे. समूह प्रतिभेचा मूर्तीमंत अविष्कार म्हणजे लोकसंस्कृती आहे त्यामध्ये एक अनवट गोडवा भरलेला असतो. लोक साहित्याप्रमाणेच लोककला या लोकांमधूनच विकसित झालेल्या आहेत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ उर्मी, प्रतिभा, श्रद्धा, परंपरा आणि प्रयोगांमधून लोककला विकसित झालेल्या आहेत. लोककलांमध्ये चित्रकला, हस्तकला, नाट्य, संगीत, नृत्य इत्यादींचा समावेश होतो. विविध देवी देवतांचे उत्सव, सण, यात्रा, महोत्सव, इत्यादी प्रसंगी लोककलांचे सादरीकरण केले जाते. सूक्ष्म निरीक्षण, श्रवण, वाचन, संवाद यातून लोककला विकसित होतात. लोकसाहित्य आणि लोककला यांच्या बरोबरीनेच लोकपरंपरा विकसित झाल्या आहेत. यामध्ये लोकदैवतांचा मोठा वाटा आहे. ग्रामदैवत आणि लोकदैवत यांच्या वरील श्रद्धा आणि अनुभूती यातून या लोकपरंपरा तयार होतात. कुंभमेळा हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. याचबरोबर विविध दैवतांचा किंवा लोकसमुहांच्या यात्रा, पूजा पद्धती, परिक्रमा, वार्षिक उत्सव, अनुष्ठान याद्वारे ही लोकपरंपरांचा विस्तार होत राहतो. अस्सल अनुभव हे लोकसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. तसेच हवे त्याला नि:शुल्क प्रशिक्षण आणि सर्वांचा नि:शुल्क सहभाग हे लोक संस्कृतीचे आगळेवेगळे स्वरुप आहे. त्यामुळे सर्वसमावेशकता, सहजता आणि निर्मळता हे लोक संस्कृतीचे विशेष गुण आहेत. अभिजात संस्कृती आणि लोक संस्कृती हे दोन्हीही भारतीय संस्कृतीचे घटक आहेत. दोन्हीची क्षेत्रे, आयाम आणि आवाका वेगवेगळा असला तरी दोन्ही संस्कृती हातात हात घालून एकमेकांसोबत नांदत आहेत आणि आपले जीवन समृद्ध करीत आहेत. या कॅप्सूल कोर्सद्वारे आपण लोकसंस्कृती आणि तिच्या आयामांचा अभ्यास करणार आहोत.

कॅप्सूल कोर्स मधील विषय

✅ लोकसंस्कृती - संकल्पना आणि व्याख्या
✅ लोकसंस्कृतीचा इतिहास
✅ लोकसंस्कृतीचे प्रकार
✅ लोकसाहित्य
✅ लोककला
✅ लोक परंपरा
✅ अभिजात संस्कृती आणि लोक संस्कृती
✅ लोकसंस्कृतीचे भारतीय ज्ञान परंपरेतील योगदान
✅ लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये
✅ लोकसंस्कृतीची आजच्या काळातील उपयुक्तता

मार्गदर्शक

डॉ. स्वरजा जाजे

PhD (Sanskrit), MA (Sanskrit), Diploma (Natyashastra & Indology)

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे

27 ते 31 जुलै, 2026

सकाळी 07:15 ते 08:30