There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Language: Marathi
मी का भारतीय आहे ? भारतीय आहे म्हणजे नक्की कोण आहे ? माझी भारतीय म्हणून काय आयडेंटिटी आहे ? संपूर्ण जगात केवळ एकमात्र देश असा आहे की ज्याला दोन नावांनी ओळखले जाते. भारत हे या आपल्या देशांचे मुळ नाव आहे. इंग्रज आणि युरोपियानानी त्यांचे इंडिया केले. खरतर कोलंबस युरोपच्या बाहेर पडला तो भारताला शोधायला. तेव्हा इंडिया हे नाव नव्हते. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या देशाला हिंदुस्तान किंवा भारत या नावानेच ओळखले जात होते. भारताचे प्राचीन काळापासून असलेले श्रेष्ठत्व आणि गौरवाचे स्थान नष्ट करण्यासाठी जाणिवपूर्वक आणि योजनाबद्धरीतीने हे कारस्थान रचण्यात आले. त्यातून फार मोठा वैचारीक गोंधळ निर्माण करण्यात आला. भारतीय सामुहिक समाजमानसाची मानसिकता कायम गोंधळलेली राहिल, दुर्दैवाने असाच शिक्षणक्रम स्वातंत्र्य मिळाल्यावरही तयार करण्यात आला. त्यातून भारतीय आपली ओळख विसरतील आणि त्यांच्या मनाची कायम द्विधा अवस्था राहिल अशी हेतुपुरस्सर योजना करण्यात आली. त्यामुळेच भारत आणि इंडिया अशी दोन नावे असलेला विचित्र देश अशी आपली ओळख बनली आहे. मी भारतीय आहे म्हणजे नक्की कोण आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. मी भारतीय का आहे ते सांगता येत नाही. त्यातच इंग्रजी माध्यमातून चर्चप्रणीत शिक्षणामुळे आम्हीच आमच्या संस्कृतीपासून तुटलो आहोत. पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यात अपयशी ठरलो आहोत. जगभरातील कोणत्याही देशाची व्यक्ती त्याच्या देशाबद्दल, इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल ठामपणे, आग्रहाने, अभिमानाने व कौतुकाने सांगू शकते. भारतीयांना मात्र त्याबद्दल फारसे काही सांगता येत नाही. अजूनही असलेले पांढऱ्या कातडीचे अनावश्यक ओझे, पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा आणि संस्कृतीचा प्रभाव आणि त्यातून आलेला न्यूनगंड यामुळे भारतीयांनी आपली ओळख गमावलेली आहे, विसरलेली आहे. आपणा प्रत्येकाची भारतीय म्हणून ओळख करून देणाऱ्या आपल्या भारतीयत्वाचा खरा परिचय करून देणारा असा हा कॅप्सूल कोर्स आहे. भारत या नावाची उत्पत्ती अनेक प्रकारांनी सांगितले जाते. भरत राजाच्या नावावरून भारत हे नाव पडले, ही प्रसिद्ध आख्यायिका आहे. तसेच भा म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान. प्रकाशामध्ये रत, ज्ञानामध्ये रत असलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत अशी मुख्य ओळख आहे. इंडिया म्हटले की आपला विचार किंवा इतिहासाचा मागोवा जास्तीत जास्त दोन तीनशे वर्षापर्यंतच मागे जातो. मात्र भारत म्हटल्यावर भारताची ओळख हजारो वर्षे मागे जाते. जगातील सर्वात प्राचीन आणि आजही जिवित असलेल्या भारतीय संस्कृती आणि सभ्यतेबरोबर आपण जोडले जातो. आपला अभिमान आणि आपला विश्वास जागृत होतो. प्रत्येक भारतीयांने भारताची आणि भारतीयत्वाची ओळख समजून घेतली पाहिजे, तिचा अभ्यास केला पाहिजे आणि आपली भारतीयत्वाची ओळख अभिमानाने प्रस्तुत केली पाहिजे.
✅ इंडिया दॅट इज भारत... आपल्या देशाची कहाणी
✅ इंडिया नाव कसे आले आणि कुठून आले?
✅ भारताची प्राचीन ओळख
✅ भारतीय संस्कृतीचा प्रवास
✅ सर्वात प्राचीन सभ्यता - भारतीय सभ्यता
✅ राष्ट्रीय ओळख आणि भौगोलिक ओळख
✅ भारताची सांस्कृतिक ओळख
✅ भारताची वैशिष्ट्ये
✅ विविधतेला एकत्र बांधणारी सूत्रे
✅ भारताच्या श्रेष्ठत्वाची कारणे
✅ भारतीयत्वाची ओळख का हवी? उपयुक्तता भारतीयत्वाची
✅ ओळखीची समस्या –आयडेंटिटी क्रायसिस
✅ भारताचे आणि भारतीयत्वाचे पुनःजागरण
प्रा. क्षितीज पाटुकले
Phd (Insurance), MA (Indology), L.L.B, Diploma in Ayurveda, MMS, PGDBM, D.I.Eसंस्थापक : भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम एवं भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी, अमेरिका